Skip to main content

Posts

Showing posts from January, 2022

...आणि पानिपत होते !

पानिपत लढाई ! प्रा डॉ योगेश मलशेट्टे एडिटर इन चीफ पुणे रिसर्च टाईम्स 9403981666 दीड लाख लोकांनी आहुती देऊन अनेक धडे आपल्याला असे अनेक शिकवले आहेत, त्यातुन आपण बोध घेणार आहोत का? आपण त्यातून काही शिकलो आणि स्वतःमध्ये सुधारणा केल्या तर तेच पानिपतावर धारातिर्थी पडलेल्या वीर सैनिकांना खऱ्या अर्थाने नमन ठरेल. आज चौदा जानेवारी! आज उत्तरायण येईल, संक्रात होईल, पतंग उडवले जातील, आणि एकमेकांना तिळगुळ खाऊ घालुन तोंड गोड केले जाईल. ह्या सगळ्यात दोनशे एकसष्ट वर्षांपुर्वी जे घडलं होतं, ते कोणाला आठवायची इच्छा होईल का?  “...आणि पानिपत होते !” सर्वात कमी वेळात, समोरासमोरच्या युद्धात सर्वात जास्त लोक मारले गेले, आतापर्यंत झालेलं जगातलं सर्वात संहारक युद्ध आहे, पानिपत! पानिपत ही मराठी माणसाच्या मनावरची एक जखम आहे, पानिपतावर एक अख्खी मराठी पिढीच नष्ट झाली. पानिपत झालं नसतं तर इंग्रज भारतावर राज्य करु शकले असते का? का झालं होतं पानिपत? पानिपत युद्धाचे परिणाम काय झाले? ह्या युद्धातून आपण काही शिकलो का? अफघाण योद्धा अहमदशहा अब्दाली आपल्या रानटी टोळ्यांना घेऊन चौंथ्यादा दिल्ली लुटायला येतो, तेव्हा आपल्या