Skip to main content

कोरोना जैविक युद्ध यानंतर होणारे केमिकल युद्ध शेवटी न्यूक्लिअर युद्ध हे सर्व तिसऱ्या महायुद्धाचा एक भाग

कोरोना जैविक युद्ध - तिसऱ्या महायुद्धाचा भाग

"कोरोना" यांनी सुरू झालेले हे जागातीक तिसरे युद्धच असून याचा मार्ग जैविक युद्धापासून, केमिकल युद्धा द्वारे न्यूक्लिअर युद्धात जावून संपेल व यातून एक नविन महाशक्ती उदायास येऊ पाहत आहे पण ते तेवढे सोपे नाही । यात लाखो लोक मरण पावणार हे अंतिम सत्य आहे।

संग्राहक संपादक 
प्रा. डॉ. योगेश मलशेट्टे 
पुणे रिसर्च टाईम्स

आजच्या लेखात आपण फक्त कोरोना जैविक युद्ध (बालॉजीकल वॉर) या विषयावर प्रकाश टाकूया ।

"कोरोना" ह्या नावाभोवती सध्या संपुर्ण जग केंद्रित झालं आहे. चीनमधून सुरू झालेला हा साथीचा आजार आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. कोरोनामुळे संपूर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू झाला आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, मीडिया वेळोवेळी अनेक सूचना करत आहेत. त्यामुळे त्याच गोष्टी मी पुन्हा पुन्हा मी इथे लिहिणार नाही. पण जर तुम्ही "कोविद-१९" हा साथीचा आजार आहे असं समजत असाल तर मात्र तुम्ही चुकत आहात. हा साथीचा आजार नसून "जैविक युद्ध" आहे. चीनने ह्या युद्धतंत्राचा फार शिताफीने वापर केला आहे. जैविक युद्धात बॅक्टेरिया आणि व्हायरसचा वापर होतो. चीनने संपूर्णपणे नवीन अश्या व्हायरसचा वापर केला आहे आणि तोही जलदगतीने संसर्गाने पसरणारा. "जैविक युद्ध" हे अणुयुद्धापेक्षाही घातक परिणाम घडवून आणणारे असते. ह्यामुळे लाखो-करोडो लोक रोगग्रस्त तर होतातच पण त्या राष्ट्राचा आर्थिक आणि सामाजिक समतोल पूर्णपणे ढासळतो.
               
कोणालाही एक प्रश्न पडेल की जर चीनला जैविक युद्ध करायचेच होते तर त्या व्हायरसचा वापर स्वतःच्या नागरिकांवर का केला..? सर्वात पहिली गोष्ट चिनी राज्यकर्त्यांना चिनी जनतेविषयी जराही आपुलकी नाही. त्यामुळे उद्या जर कोणत्याही देशाने चीनकडे बोटं उगारलं तर चिनी राज्यकर्ते बोलून मोकळे होतील की आमच्या जनतेला आणि चीनच्या अर्थव्यवस्थेलाही फटका बसलाय. एकंदरीत 'सेफ गेम'.

चीनचे वुहान शहरामध्ये एक संस्था आहे. वुहान इस्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी. ह्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या विषाणूंवर संशोधन  येते आणि चीनच्या सरकारी आकडेवारीनुसार १५०० वेगवेगळे व्हायरस ह्या संस्थेमध्ये संवर्धित करून ठेवले आहेत. त्याच वुहान शहरामध्ये कोरोनाचा सर्वप्रथम फैलाव होतो. सुरवातीच्या काळात एक डॉक्टर ह्या व्हायरसबद्दल इतर डॉक्टरांना सावध करतो. त्या डॉक्टरला अटक होते. त्याच्याकडून लिहून घेतलं जातं की असा कोणताही व्हायरस नाही आहे आणि ह्यापुढे अशा अफवा पसरवणार नाही. एकप्रकारे प्रकरण दाबलं जात. पुढे तोच डॉक्टर कोरोनामुळे मरतो. पुढे हा व्हायरस तिथून इटली युरोपपासून अमेरिकेपर्यंत पसरतो. पण चीनचा आर्थिक कणा मनाली जाणारी शांघाय आणि राजधानी बीजिंग ह्या शहरांमध्ये प्रभाव जाणवत नाही. जरी जाणवला तरीही अगदीच नगण्य.  त्यानंतर चीनमध्ये तो व्हायरस नियंत्रित व्हायला सुरुवात होते. ह्याचाच अर्थ काय तर कोरोनाचा संसर्ग सुरू होण्यापूर्वीच  चीनकडे त्याच औषध तयार होते. सगळं कसं चपखल ठरवून घडवून आणल्यासारखं आहे.
               
ह्या सगळ्यातून चीनला काय फायदा झाला...??? सध्या व्हाट्सअप्प वर ह्या विषयावर अनेक मेसेजेस फिरत आहेत.  चीनने विदेशी कंपन्यांचे शेअर्स कमी किमतीत विकत घेतले. सगळ्या विदेशी कंपन्या चीनच्या नियंत्रणात आल्या. वगैरे वगैरे... मेसेज चुकीचे नाहीत पण आधीच हे मेसेज सगळीकडे पोहोचले आहेत त्यामुळे त्यावर फारसं लिहित नाही. कालच एक बातमी वाचली ती अशी की चीनने स्पेनला ४३२ मिलियन युरो इतक्या किंमतीच्या वैद्यकीय समानाची निर्यात केली. ह्यावरूनच समजत चीन किती तयारीत आहे. पण जर जागतिक महासत्ता बनायचे असेल तर फक्त आर्थिक बाजू मजबूत असून चालत नाही तर सामरिक ताकद आणि व्युहरचनाही तितकीच प्रबळ असायला हवी आणि चीनला ह्याची पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे ह्या कोरोना प्रकरणामुळे चीनला जे सामरिक फायदे झाले आहेत ते आर्थिक फायद्यांपेक्षा फार मोठे आणि महत्वाचे आहेत. त्याची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी एक वर्ष मागे जावं लागेल.
        
जुलै २०१९ मध्ये तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई-इंग-वेन ह्यांनी अचानक अमेरिका भेट घेलती होती. त्या पॅराग्वेला जात असताना मध्ये अमेरिकेत स्टॉपओव्हर साठी थांबल्या होत्या असे सांगण्यात आले. पण त्या मधल्या काळात त्यांच्या अमेरिकेमध्ये ज्या काही भेटीगाठी झाल्या त्यावरून तरी पॅराग्वेला जाणे हे निमित्त होते असेच समजते. चीनने ही ह्या भेटीवर सडकून टीका केली होती. तैवानच्या राष्ट्राध्यक्षांची आजवरची पहिलीच अमेरिका भेट, दौरा इतका घाई गडबडीत झाला होता. आणि ह्या भेटीनंतर हाँगकाँग मध्ये लोकशाहीवादी आंदोलनांनी जोर धरला. चीन ह्या सगळ्या आंदोलनामध्ये अडकून पडला आणि चीनच्या पुढील सामरिक योजनांना खीळ बसली. त्यातही तैवानच्या राष्ट्राध्यक्षांच्या अमेरिका भेटी आधी चीनने तैवान जवळ लष्करी सरावांची तीव्रता वाढवली होती. ह्या सगळ्या घटनाक्रमाचा सरळ अर्थ असा निघतो की चीनने तैवानवर हल्ला करण्याची सगळी तयारी केली होती. त्याची कुणकुण लागताच तैवानच्या राष्ट्राध्यक्षा घाई गडबडीत अमेरिकेला गेल्या. त्यांनतर अमेरिकेने हाँगकाँग मधील आंदोलनांना पाठबळ देऊन त्याची तीव्रता वाढवली. चीन स्वतःच्याच क्षेत्रीय संघर्षात अडकून पडला. चीनने हाँगकाँग मधील आंदोलनामागे अमेरिकेचा हात आहे असा आरोप केला होता, हेही विसरून चालणार नाही.
               
हे हाँगकाँग प्रकरण जोरात सुरू असताना मी व्हाट्सअप्प वर एक छोटा लेख शेअर केला होता. त्यावेळी मी त्यात काही वाक्य लिहिली होती ती अशी की, हाँगकाँग मधील आंदोलन हे चिनी ड्रॅगनच्या घशात अडकलेला काटा आहे. तो तसाच ठेवता येत नाही आणि काढताही येत नाही, अशी अवस्था झाली होती. तो काटा ड्रॅगन कसा निस्तरतो त्यावर पुढील घटनाक्रम अवलंबून आहे. चीनने तो काटा सहज काढलाय तोही दुसऱ्या जहरी काट्याने. तो जहरी काटा आहे कोरोना व्हायरस. ज्याप्रमाणात चीनमध्ये कोरोनाचा फैलाव होत गेला त्याप्रमाणात हाँगकाँग मधील आंदोलन थंडावत गेलं. आज कुठेही हाँगकाँगच्या आंदोलनाचा शब्दही समोर येत नाही. दुसरा फायदा असा झाला की अमेरिकेसोबत जे व्यापारी युद्ध सुरू होतं तेही काही प्रमाणात थंडावले आहे. त्यामध्ये चीनचे जे काही नुकसान झाले आहे तेही भरून निघत आहे. पण अमेरिका मात्र मेडिकल इमर्जन्सी मध्ये पुरती अडकली आहे आणि अमेरिकेचा आशियातील सर्वात मोठा मित्र देश भारतही. ह्या सर्व घटनांचा अर्थ एकच होतोय तो म्हणजे येणाऱ्या लवकरच्याच काळात चीन शेजारील दोन देशांवर हल्ला करू शकतो. ते सॉफ्ट टार्गेट देश म्हणजे तैवान आणि दक्षिण कोरिया. हे सर्व अमेरिकेतील मेडिकल इमर्जन्सी संपण्याआधी होण्याची शक्यताच जास्त आहे. जेणेकरून अमेरिकेला पूर्ण ताकदीनिशी विरोध करता येणार नाही.
            
आता ह्या सगळ्याचा आपल्याशी- भारताशी काय संबंध.??? तर संबंध आहे. गेल्या महिन्यात एक घटना समोर आली होती ज्याकडे कोणीही फारसं गंभीरपणे पाहिलं नाही. भारतीय नौदलाने चीनचे मालवाहतूक करणारे एक जहाज ताब्यात घेऊन कांडला बंदरात आणले. त्यात बॅलेस्टिक मिसाईल्स लाँच करण्यासाठी लागणाऱ्या उपकरणांचे सुटे भाग होते. चीन त्यांच्या व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी नेहमी आक्रमक असतो. पण हे जहाज पकडल्यानंतर चीनकडून जहाल प्रतिक्रिया आली नाही. कारण ह्या प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय संघटनांकडे तक्रार होऊ शकते. म्हणून चीनने नमते धोरण घेतले. पण हे युद्ध साहित्य पाकिस्तानात पाठवून चीन कसली तयारी करत होता...??? एक गोष्ट लक्षात घ्या जरी भारत चीनचा महत्वाचा व्यापारी भागीदार असला तरीही चीनला महासता बनायचं असेल तर भारत हा एकच अडसर ठरतोय. भारताबाबत चीनची भूमिका तुकडे पाडण्याचीच आहे. अनेकदा चिनी वृत्तपत्रांतून भारताचे तुकडे करा अशा प्रकारचे मजकूर छापून आले आहेत. भारताचा अडसर बाजूला करण्यासाठी चीन कोणतीही पातळी गाठू शकतो. भारतात कोरोनाचा फैलाव होणे हे अपेक्षितच होते. परंतु तो थेट चीनमधून न येता इतर देशातून आला. त्यानंतर वैद्यकीय साहित्यांची चीनला होणारी निर्यात राखून भारत सरकारने चीनला योग्य तो संदेश दिलाच आहे. जर तैवान आणि दक्षिण कोरिया चीनच्या ताब्यात आले तर संपुर्ण ईस्ट चायना सी आणि साऊथ चायना सी म्हणजेच संपूर्ण इंडो-पॅसिफिक क्षेत्रावर चीनचे वर्चस्व निर्माण होईल. अशा परिस्थितीत अमेरिकेला एकट्याने चीनचा सामना करणे अवघड जाईल. अशा वेळी अमेरिका भारताकडून सहकार्य मागेल. त्यावेळी पाकिस्तान आणि चीनकडून भारताविरुद्ध संघर्ष सुरू होण्याची दाट शक्यता आहे. हे जर मला-तुम्हांला समजतय तर भारत सरकारला नक्कीच ह्याबद्दल आपल्यापेक्षा जास्त माहीत असणार. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या सगळ्या गोष्टींसाठी फार आधीपासूनच तयार आहेत. पण मग आम्ही काय करायचं...???

आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करायचे. आजही आम्ही युद्धामध्येच आहोत आणि उद्याही युद्धामध्येच असणार आहोत. मला नेहमीच इस्रायली जनतेचे फार कौतुक वाटते. युद्ध असो की इतर आणीबाणी प्रत्येक इस्रायली नागरिक हा एक सैनिक बनतो. अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत. सैनिक बनणे म्हणजे आघाड्यांवर जाऊन बंदूक घेऊन लढायलाच पाहिजे असे नाही. तर लोकनियुक्त सरकारला (मग ते कोणत्याही पक्षाचे असो.!) पूर्ण सहकार्य करणे, हेही लढण्याइतकेच महत्वाचे काम आहे.

मित्रांनो, अनेक जण विचारतात की तिसरे महायुद्ध कधी सुरू होणार...??? पुन्हा चुकताय... तिसरे महायुद्ध सुरू होऊन अनेक वर्ष लोटली आहेत. ह्या २०२० सालापासून ह्या तिसऱ्या महायुद्धाचा अंतिम भाग सुरू झालाय जो अजून ४-५ वर्षांनी संपेल. ह्यापुढे लढले जाणारे प्रत्येक युद्ध हे फक्त सीमांवर लढले जाणारे नसेल तर ते तुमच्या आमच्या दारापर्यंत, घराघरात पोहोचलेले असेल. "कोरोना" व्हायरसने हे सिद्ध करून दाखवलंय. प्रत्येक गोष्टीची जबाबदारी सरकारवर टाकून चालणार नाही. युद्धतंत्र बदलत आहेत. ह्यापुढे रात्रच नाही तर दिवसही वैऱ्याचा आहे. येणारे दिवस अजूनही बिकट असू शकतात. त्यामुळे  ह्यापुढे आम्ही कसे वागतो, येणाऱ्या कठीण प्रसंगांना एक देश, एक राष्ट्र म्हणून कसे सामोरे जातो ह्यावरच आपल्या भारत देशाचं भवितव्य अवलंबून आहे.

प्रा. डॉ. योगेश मलशेट्टे*
पुणे रिसर्च टाईम्स

*लेखक हे फ्रीलांस ब्लॉगर असून आंतरराष्ट्रीय संबंध व राजकारण याचे अभ्यासक आहेत.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आधुनिक अभिनव तंत्रगुरु राजीवभाऊ जगताप सर :- एक अनुभव

आधुनिक अभिनव तंत्रगुरु श्री राजीवभाऊ जगताप  सर  :-  एक अनुभव  लेखक:- प्रा डॉ योगेश मलशेट्टे अभिनव एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप सर यांच्या अथक प्रयत्नांनी १९९८ मध्ये संस्थेची स्थापना केली तसेच 2007 मध्ये वडवाडी या ठिकाणी तंत्र संकुलनाची सुरुवात केली. आज सोसायटीचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. अभिनव एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक आणि डिग्री हे याचाच एक भाग आहे या इंजीनियरिंग कॉलेजच्या मार्फत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजीव भाऊ जगताप यांनी वडवाडी, भोर पासून जवळच, भाटघर धरणाच्या अगदी समोर चाळीस एकर च्या विशाल वडवाडी पठारा वरील कॅम्पसमध्ये तंत्रशिक्षणाची ची सुरुवात केली आणि आज इथे सर्व सुविधायुक्त तंत्रशिक्षणाचे संकुल अतिशय जोमात तंत्रशिक्षण देण्याचं काम करत आहे मला इथे आवर्जून सांगावेसे वाटते की या तंत्रनिकेतनात साधारणता 22 जिल्ह्यातील  122 पेक्षा जास्त तालुक्यातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा या भागातील ग्रामीण भागातील व...

चीनच्या ड्रॅगनचे विस्तारवादी धोरण आणि संभाव्य धोके

भारताला जागतिक महासत्ता व्हायचे असेल तर...  प्रा. डॉ. योगेश मलशेट्टे पुणे रिसर्च टाईम्स  +91 - 9403981666 (व्हाट्सएप) भारताला जागतिक महासत्ता व्हायचे असेल तर आपल्यालाही तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन मध्ये जबरदस्त मक्तेदारी निर्माण करावीच लागेल. आणि त्यासाठी इंधन आणि खनिज संपत्ती यांची नितांत गरज आहे. म्हणून भारताने चीनच्या डावाला प्रतिडाव अन् शहाला प्रतिशह द्यावाच लागेल. मध्य आशिया चीनच्या घशात जाणार नाही ह्याची तजवीज करावी लागेल.  भारताने आपल्या प्राचीन संस्कृतीचा इतिहास पाहून वर्तमान विदेश नीती चा पुनर्विचार करावा असाही आपण २०१४ पासून मोदी युगात खूप बदल केलेले आहेत उदा सांगायचे असेल सर्जिकल स्ट्राईक असो वा एअरस्ट्राईक आसो.  "वसुधैव कुटुम्बकम्"  हे भगवतगीतेतील असो वा ज्ञानेश्वर माऊली नि पसायदान मध्ये म्हटले आहे की, हे विश्वची माझे घर त्यासाठी हे विश्व आगोदर माझे म्हणजे भारताच्या ताब्यात आसले पाहिजे अंतरिक्ष आसो वा समुद्रतळ आसो.  बौद्धपूर्व कालखंडात तिबेटला त्रिविष्टप हे नाव होते. हिंदूंचे तेथे राज्य होते. झिनजियांग सह सबंध मध्य आशिया व अफगाणिस्तान येथे प्राचीन ...

China disputes with 18 countries

China's Border Disputes Dr. Yogesh Malshette PUNE RESEARCH TIMES China has border disputes with 18 countries that surround China from all sides. From India to Japan to The Philippines, China has on several occasions been subject of criticism by the international community over its 'expansionist policies'. China's Border Disputes 1)  India   China occupies 38,000 sq km Indian territory that goes by the name Aksai Chin. It also stakes claim on Arunachal Pradesh and Ladakh. It was this expansionist policy that led to the recent clashes between the PLA and the Indian Army. 2)  Vietnam   China claims large parts of Vietnam on historical precedent (Ming Dynasty, 1368-1644). Also, Macclesfield Bank, Paracel Islands, parts of the South China Sea and the Spratly Islands.  3)  Japan  Parts of South China Sea particularly Senkaku Islands, Ryukyu Islands are claimed by Japan and both countries are at loggerheads with this boundary issue 4) Nepal   China ...