Skip to main content

लॉक डाऊन मध्ये जग आणि आपण भारतीय

अमेरिका, जर्मनी आणि भारत ह्या तिन्ही देशातील लॉक डाऊनची  जर तुलना करायची झाली तर...

प्रा. डॉ. योगेश मलशेट्टे
पुणे रिसर्च

अमेरिकी राष्ट्रध्यक्षा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले आरोप (युरोपियन युनियन मधील बरेच राष्ट्र) जर खरे असतील म्हणजेच कोरोना कोविड19 वायरस जर हुहान च्या प्रयोगशाळेत तयार केला हे सत्य असेल (कदाचित आहे) तर मग ही जगातील तिसऱ्या महायुद्धाची सुरवात आहे त्यात आपण जास्तच दक्ष असणे गरजेचे आहे कारण चीनचे डेली या या सरकारी वृत्तपत्रा मध्ये 1500 (दिड हजार) व्हायरस चे संकलन आहे हे आधीच सांगितले आहे. मग मात्र या तिसऱ्या महायुद्धात आपण कसे राहावे या बद्दल थोडस मत व्यक्त केले आहे

अमेरिकेत अनेक लोकांना लॉक डाऊन मान्य नाहीये. ते नाही पाळले तर त्यातून उदभवणाऱ्या धोक्याची त्यांना जाणीव आहे ... पण सरकारने लोकांच्या स्वातंत्र्यावर बंधने न आणता परिस्थिती काबूत आणावी अशी त्यांची मागणी आहे. 

लवकरात लवकर लॉक डाऊन संपून नोकरी व्यवसाय परत चालू व्हावेत अशी मुख्य मागणी मोर्च्यांतून, मुलाखतींतून वगैरे असते. 

दुसरे म्हणजे, चीन ने आपली अर्थव्यवस्था नष्ट करायला हा विषाणू तयार केला असावा अशी एक शंका इथे आहे. त्यामुळे ह्या प्रकाराकडे एक आक्रमण किंवा युद्ध म्हणून बघावे आणि तसे असेल तर आपली अर्थव्यवस्था कदापिही ढासळू द्यायची नाही, मग त्यासाठी कितीही मनुष्य हानी झाली तरी चालेल असा एक मतप्रवाह आहे. युद्धात मनुष्य हानी होतेच, ती सहन करायची आणि अर्थव्यवस्था शाबूत ठेऊन शेवटी हे युद्ध जिंकायचे असे अनेकांच्या बोलण्यातून येते.

जर्मनीतून सुद्धा बऱ्यापैकी अश्याच स्वरूपाचे मेसेजेस येतात.

अर्थव्यवस्था किकस्टार्ट कशी करायची. लोकांपर्यंत स्टिम्युलस कसा पोचवायचा. भविष्यात अश्याच स्वरूपाच्या घातक साथी येतील तर त्याला तोंड द्यायला काय प्रकारची उत्पादने, सर्व्हिसेस निर्माण करायच्या..  वगैरे.

अनेक कम्पन्यानी एव्हाना ऑफिस स्ट्रक्चर बदलले आहे. एम्प्लॉयी बसायच्या जागा प्लेक्सिग्लास लावून प्रत्येक माणसाला प्रायव्हेट जागा कशी करून देता येईल याचा विचार केला आहे. 

विमान कम्पन्यानी बसायच्या पद्धतीत बदल करून विमान प्रवास जास्तीतजास्त सुरक्षित कसा करता येईल इकडे लक्ष दिले आहे. 

सुपर स्टोर्स नि ग्राहकांना सेफ कसे ठेवता येईल ह्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. हातावर सॅनिटायसरचा फवारा, बिलिंग काउंटर वर आयसोलेशन, ग्राहकांना चालण्यासाठी चक्राकार पद्धत, अत्यंत एफिशिएंट ऑन लाईन डिलिव्हरी अश्या अनेक गोष्टी इथल्या समाजाने गेल्या ३०-४० दिवसात केल्या आहेत. 

एकूण देश आणि अर्थव्यवस्था कशी टिकवायची फक्त ह्याचीच चर्चा इथे दिसते. विशेषकरून ‘पुरुषांना घरात राहावे लागल्यामुळे’ ह्या मुख्य सूत्रावर आधारित फालतू विनोद... ह्याचा पूर्ण अभाव. 

भारतातून काय वाचायला मिळते?

दारूची वानवा, पुरुषांनी भांडी घासणे, बायको आणि तिच्या आईचे फोन, पुरुषांना घरी स्वयंपाक करायला लागणे, xxxवर पोलिसांनी मारलेले फटके, तबलीघी, मोदी, राहुल इत्यादी विषयावर विनोद. 

किंवा कुणाच्यातरी दुःखाचे केलेले राजकारण, उदा. मजुरांची पायपीट. 

८०० किमी चालून जाणाऱ्या कुटुंबाला वाटेत १ कुटुंब किंवा १ गाव असे मिळू नये जे त्यांना अन्न वस्त्र निवारा देऊ शकले असते आणि त्यांची पायपीट थांबवू शकले असते? 

कुटुंब ८०० किमी चालून गेलं ह्याची बातमी पण त्यांना कोणी आसरा दिला नाही.... हि बातमी नाही? 

एक राष्ट्र एक समाज म्हणून एकत्र कसे लढायचे ह्यावर एक पोस्ट किंवा मेसेज नाही. 

कोरोना गेल्यावर जिद्दीने कसे उभे राहायचे, नुकसान (देशाचे राहूद्या .. किमान स्वतःचे) कसे भरून काढायचे ह्यावर एक पोस्ट नाही.

परत कोरोना सारखी साथ आली तर कशी आणि काय तयारी ठेवायची ह्यावर भाष्य नाही.

दुप्पट किमतीत भाज्या आणि धान्य का घ्यावे लागतेय ह्याच्यावर कोणी बोलणार नाही पण दारू नाही मिळाली तर सरकारचा महसूल कसा बुडतो वगैरे वर Phd. 

पासपोर्ट विरुद्ध राशन कार्ड पोस्ट्स. 

लागोपाठ इरफान गेला, ऋषी गेला म्हणून आश्चर्य वगैरे व्यक्त करणाऱ्या पोस्ट्स.  कुणाच्या शेवटच्या घटकांचा व्हिडीओ, इरफानला जाळले कि पुरले, ऋषीची इस्टेट किती वगैरे पोस्ट्स.

वास्तविक दोघेहि कॅन्सरने गेले पण कॅन्सरशी लढा कसा द्यायचा ह्यावर आली का एखादी पोस्ट?
या उलट घरात किती तेलकट, तुपकट, चमचमीत करून खातोय त्या पोस्ट्सचा खच. 
आपण अडचणीत आहोत. कोरोना नंतर भीषण मंदी येणार आहे, उधळमाधळ नको करायला कसलीही जाणीव नाही. 

आणि आता दारू साठी लागलेल्या रांगा ह्यावर पुढे २-३ दिवस चालतील. 

खरंच एक समाज म्हणून लज्जास्पद वर्तणूक आहे आपली.

प्रा. डॉ. योगेश मलशेट्टे
पुणे रिसर्च

Comments

Popular posts from this blog

कोरोना जैविक युद्ध यानंतर होणारे केमिकल युद्ध शेवटी न्यूक्लिअर युद्ध हे सर्व तिसऱ्या महायुद्धाचा एक भाग

कोरोना जैविक युद्ध - तिसऱ्या महायुद्धाचा भाग "कोरोना" यांनी सुरू झालेले हे जागातीक तिसरे युद्धच असून याचा मार्ग जैविक युद्धापासून, केमिकल युद्धा द्वारे न्यूक्लिअर युद्धात जावून संपेल व यातून एक नविन महाशक्ती उदायास येऊ पाहत आहे पण ते तेवढे सोपे नाही । यात लाखो लोक मरण पावणार हे अंतिम सत्य आहे। संग्राहक संपादक  प्रा. डॉ. योगेश मलशेट्टे  पुणे रिसर्च टाईम्स आजच्या लेखात आपण फक्त कोरोना जैविक युद्ध (बालॉजीकल वॉर) या विषयावर प्रकाश टाकूया । "कोरोना" ह्या नावाभोवती सध्या संपुर्ण जग केंद्रित झालं आहे. चीनमधून सुरू झालेला हा साथीचा आजार आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. कोरोनामुळे संपूर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू झाला आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, मीडिया वेळोवेळी अनेक सूचना करत आहेत. त्यामुळे त्याच गोष्टी मी पुन्हा पुन्हा मी इथे लिहिणार नाही. पण जर तुम्ही "कोविद-१९" हा साथीचा आजार आहे असं समजत असाल तर मात्र तुम्ही चुकत आहात. हा साथीचा आजार नसून "जैविक युद्ध" आहे. चीनने ह्या युद्धतंत्राचा फार शिताफीने वापर केला आहे. जैविक युद्धात बॅक...

चीनच्या ड्रॅगनचे विस्तारवादी धोरण आणि संभाव्य धोके

भारताला जागतिक महासत्ता व्हायचे असेल तर...  प्रा. डॉ. योगेश मलशेट्टे पुणे रिसर्च टाईम्स  +91 - 9403981666 (व्हाट्सएप) भारताला जागतिक महासत्ता व्हायचे असेल तर आपल्यालाही तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन मध्ये जबरदस्त मक्तेदारी निर्माण करावीच लागेल. आणि त्यासाठी इंधन आणि खनिज संपत्ती यांची नितांत गरज आहे. म्हणून भारताने चीनच्या डावाला प्रतिडाव अन् शहाला प्रतिशह द्यावाच लागेल. मध्य आशिया चीनच्या घशात जाणार नाही ह्याची तजवीज करावी लागेल.  भारताने आपल्या प्राचीन संस्कृतीचा इतिहास पाहून वर्तमान विदेश नीती चा पुनर्विचार करावा असाही आपण २०१४ पासून मोदी युगात खूप बदल केलेले आहेत उदा सांगायचे असेल सर्जिकल स्ट्राईक असो वा एअरस्ट्राईक आसो.  "वसुधैव कुटुम्बकम्"  हे भगवतगीतेतील असो वा ज्ञानेश्वर माऊली नि पसायदान मध्ये म्हटले आहे की, हे विश्वची माझे घर त्यासाठी हे विश्व आगोदर माझे म्हणजे भारताच्या ताब्यात आसले पाहिजे अंतरिक्ष आसो वा समुद्रतळ आसो.  बौद्धपूर्व कालखंडात तिबेटला त्रिविष्टप हे नाव होते. हिंदूंचे तेथे राज्य होते. झिनजियांग सह सबंध मध्य आशिया व अफगाणिस्तान येथे प्राचीन ...

हिमालयीन 'ट्राय-जंक्शन्स' वर चीनचा डोळा

हिमालयीन 'ट्राय-जंक्शन्स' वर चीनचा डोळा    प्रा. डॉ. योगेश मलशेट्टे पुणे रिसर्च टाईम्स भारत-चीन या ४०५६ किमी लांब सीमेवर एकूण ४ महत्वाचे 'ट्राय-जंक्शन्स' आहेत.  'ट्राय-जंक्शन' म्हणजे काय, तर एक असा छोटासा भूभाग जिथे तीन देशांच्या सीमा येऊन मिळतात. हा भूभाग लष्करीदृष्ट्या अतिसंवेदनशील असतो.  ही 'ट्राय-जंक्शन्स' हिमालयाची प्रवेशद्वारे आहेत. जी अशा मोक्याच्या ठिकाणी आहेत की जो देश या चारही ट्राय-जंक्शन्स वर ताबा मिळवेल, तोच या खडतर हिमालयीन युद्धक्षेत्रात वरचढ ठरेल. कारण त्यांची भौगोलिक स्थिती सैन्याला जबरदस्त लेव्हरेज प्रदान करते. ही ट्राय-जंक्शन्स खालीलप्रमाणे आहेत-  १. सियाचीन ग्लेशियर  २. कालापानी / लिपुलेख पास  ३. डोकलाम  ४. दिफु पास सुदैवाने या ४ पैकी ४ ही ट्राय-जंक्शन्स भारताच्याच अधिपत्याखाली आहेत. साहजिकच चीनी ड्रॅगनची वक्रदृष्टी यांवर आहे. म्हणून या सर्व ट्राय-जंक्शन्सचे सामरिक महत्व जाणून घेणे आवश्यक ठरते.  १. सियाचीन ग्लेशियर- 🇮🇳🇵🇰🇨🇳 भारत-पाकिस्तान-चीन यांच्या सीमा या फक्त   ७६ चौ.किमी क्षेत्रफळ असलेल्या सियाचीन ट्राय...