Skip to main content

आधुनिक अभिनव तंत्रगुरु राजीवभाऊ जगताप सर :- एक अनुभव

आधुनिक अभिनव तंत्रगुरु श्री राजीवभाऊ जगताप सर :- एक अनुभव 


लेखक:- प्रा डॉ योगेश मलशेट्टे

अभिनव एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप सर यांच्या अथक प्रयत्नांनी १९९८ मध्ये संस्थेची स्थापना केली तसेच 2007 मध्ये वडवाडी या ठिकाणी तंत्र संकुलनाची सुरुवात केली. आज सोसायटीचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. अभिनव एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक आणि डिग्री हे याचाच एक भाग आहे या इंजीनियरिंग कॉलेजच्या मार्फत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजीव भाऊ जगताप यांनी वडवाडी, भोर पासून जवळच, भाटघर धरणाच्या अगदी समोर चाळीस एकर च्या विशाल वडवाडी पठारा वरील कॅम्पसमध्ये तंत्रशिक्षणाची ची सुरुवात केली आणि आज इथे सर्व सुविधायुक्त तंत्रशिक्षणाचे संकुल अतिशय जोमात तंत्रशिक्षण देण्याचं काम करत आहे मला इथे आवर्जून सांगावेसे वाटते की या तंत्रनिकेतनात साधारणता 22 जिल्ह्यातील  122 पेक्षा जास्त तालुक्यातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा या भागातील ग्रामीण भागातील विद्यार्थी या तंत्रशिक्षणात ऍडमिशन घेतात. इथे सर्व विद्यार्थिनीना यांना मोफत शिक्षणाची सुविधा करून देण्यात आलेली आहे याच्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कुठलाही खर्च इथे होत नाही तसेच अत्यंत अल्प दरामध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलींसाठी हे संकुल अतिशय उपयोगी आहे कारण इथे मुलींना कॉलेजची फीस पूर्णता माफ होत आहे तसेच सर्वच मुला-मुलींना होस्टेल ही मोफत आहे. 

या तंत्रनिकेतनामध्ये आधुनिक तंत्रशिक्षणाचे कास धरून विद्यार्थ्यांना आत्ताच्या नवीन तंत्रज्ञानाविषयी सतत जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्वक प्रयत्न केले जातात जसे की पायथॉन, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग,डीप लर्निंग, इंडस्ट्री 4.0, रोबोटिक्स, थ्रीडी प्रिंटिंग, सेन्सर टेक्नॉलॉजी या पद्धतीच्या शिक्षणावर  वेगळे प्रयत्न करून वेगवेगळे सेमिनार, इन्व्हाईटेड गेस्ट, वर्कशॉप यांची नियोजन कॉलेज करून केले जाते याच्यामुळे येथील विद्यार्थी कुठेही मागे पडत नाही. 

इथे सर्व विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणासोबतच मूल्य शिक्षणाचे ही धडे दिले जातात कारण आजच्या आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये फक्त तंत्रशिक्षणावरच वेळ न देता मूल्यशिक्षण ही देणे ही काळाची गरज आणि यासाठी अभिनव तंत्र संकुलनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे मूल्यशिक्षण देण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात जसे की संत सेवा संघ असेल किंवा इतर वेगवेगळ्या एनजीओ मार्फत वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात असतात उदाहरणार्थ काही दिवसांपूर्वीच इथे रामायण एक चिंतन व काळाची गरज या विषयावर पाच दिवसीय कॉलेज संपल्यानंतर सायंकाळी शिबिर आयोजित करण्यात आले आणि याचा निश्चितच फायदा सर्व मुला मुलींना झालेला आहे. 

काळाची गरज म्हणजेच तंत्रशिक्षण पण हे देत असताना सर्वांना समान व काळानुरूप असणे अत्यंत गरजेचे आहे त्याचबरोबर मूल्यशिक्षण हा आधुनिक तंत्रशिक्षणाचा गाभा असलाच पाहिजे या दोन्ही गोष्टीचा संगम म्हणजेच आधुनिक भारतीय शिक्षण होय या सगळ्यांचा विचार करून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजू भाऊ जगताप यांनी यासंदर्भात स्वतः लक्ष घालून एकेकाळी असणारे छोटेसे रोपटे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. 

आज 14 फेब्रुवारी म्हणजेच राजीव भाऊंचा वाढदिवस यानिमित्त एक छोटीशी आठवण मला सहज झाली ती म्हणजे काही दिवसापूर्वी मी माननीय कै. श्री रामकृष्ण मोरे यांच्या संदर्भातील एक पुस्तक "परामर्श एका शिल्पकाराचा" याच्यामध्ये एक लेख जो प्राध्यापक मोरे सर यांच्या सुकन्या डॉ. स्नेहल मोरे सध्या त्या अमेरिकेतील मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये नोकरी करत आहेत यांनी लिहिलेला आहे याच्यात त्यांनी लिहिलेला एक प्रसंग मला सहज आठवतो त्या थर्ड इयरला एमबीबीएस शिक्षण घेत होत्या त्यावेळेस प्राध्यापक रामकृष्ण मोरे माजी मंत्री यांचा एक्सीडेंट मध्ये मृत्यू झाला आणि याचा जबर मानसिक आघात हा स्नेहल वरती झाला कारण स्नेहल ची तब्येत अगोदरच व्यवस्थित राहत नव्हती यांच्यामुळेच त्यांची गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळे येथील ऍडमिशन कॅन्सल करून डॉ डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे येथे त्यांनी घेतलेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये ही घटना खूपच हृदय विदारक होती आणि यामधून बाहेर काढण्याचे सर्व श्रेय हे राजीवभाऊ जगताप सर यांना जाती कारण डॉ. स्नेहल स्नेहल यांनी या पुस्तकातील लेखांमध्ये यांच्या विषयी खूप गौरवपूर्ण "फॅमिली मेंबर" "वडील तुल्य" व्यक्तिमत्त्वाची उल्लेख केलेला आहे. खरंच आपणासाठी ही प्रेरणादायक गोष्ट आहे फक्त आपल्या जवळच्या व्यक्तींना आपल्या मुलीप्रमाणे वागवत नसून अभिनव तंत्रशिक्षणामध्ये जवळपास 500 पेक्षा जास्त मुली ज्या वस्तीगृहामध्ये राहत आहेत यांचीही पालकत्व आपल्या राजीव भाऊंनी आपल्याकडेच घेतलेले आहे यांच्यामुळे यांच्या मनाचा मोठेपणा व भविष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपणास सहज आकर्षित करतो. 

पारंपरिक पद्धतीनुसार पुस्तकी ज्ञान न देता स्वतःहून शिकण्यास प्रवृत्त करणे हे आजच्या शिक्षणाचे वैशिष्ट्य आहे. केवळ पुस्तककेंद्री व्यवस्था बदलून रचनावादी करणे हे आजचे एक आव्हान आहे. सर्व गोष्टींचा विचार करून शैक्षणिक क्षेत्रात गेल्या जवळपास 25 वर्षांपासून दैनंदिन अभ्यासाबरोबरच अनेक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले गेल्यामुळे विद्यार्थी स्वतः अनुभवातून अनुभूती घेत आहेत. केवळ पुस्तकातील ज्ञान देणे या मर्यादित कक्षेच्या बाहेर जाऊन विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शिक्षण मिळावे आणि विषयाचे आकलन सहजसुलभ व्हावे; म्हणून स्मार्ट बोर्डद्वारे शिक्षण दिले जाते. 

आजच्या या पावन महत्त्वपूर्ण व अतिशय आनंददायक दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी 2023 या दिवशी त्यांना वाढदिवसाच्या अभिनव एज्युकेशन सोसायटीची तंत्र संकुल वडवाडी येथील सर्व प्राध्यापक शिक्षेतर कर्मचारी विद्यार्थी नी पालक यांच्यातर्फे वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. 

आपलेच 


प्रा डॉ योगेश मलशेट्टे

9403981666 9850829095

अभिनव एज्युकेशन सोसायटीचे 

कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी 

(पॉलिटेक्निक व डिग्री) वडवाडी कॅम्पस



Comments

Popular posts from this blog

कोरोना जैविक युद्ध यानंतर होणारे केमिकल युद्ध शेवटी न्यूक्लिअर युद्ध हे सर्व तिसऱ्या महायुद्धाचा एक भाग

कोरोना जैविक युद्ध - तिसऱ्या महायुद्धाचा भाग "कोरोना" यांनी सुरू झालेले हे जागातीक तिसरे युद्धच असून याचा मार्ग जैविक युद्धापासून, केमिकल युद्धा द्वारे न्यूक्लिअर युद्धात जावून संपेल व यातून एक नविन महाशक्ती उदायास येऊ पाहत आहे पण ते तेवढे सोपे नाही । यात लाखो लोक मरण पावणार हे अंतिम सत्य आहे। संग्राहक संपादक  प्रा. डॉ. योगेश मलशेट्टे  पुणे रिसर्च टाईम्स आजच्या लेखात आपण फक्त कोरोना जैविक युद्ध (बालॉजीकल वॉर) या विषयावर प्रकाश टाकूया । "कोरोना" ह्या नावाभोवती सध्या संपुर्ण जग केंद्रित झालं आहे. चीनमधून सुरू झालेला हा साथीचा आजार आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. कोरोनामुळे संपूर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू झाला आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, मीडिया वेळोवेळी अनेक सूचना करत आहेत. त्यामुळे त्याच गोष्टी मी पुन्हा पुन्हा मी इथे लिहिणार नाही. पण जर तुम्ही "कोविद-१९" हा साथीचा आजार आहे असं समजत असाल तर मात्र तुम्ही चुकत आहात. हा साथीचा आजार नसून "जैविक युद्ध" आहे. चीनने ह्या युद्धतंत्राचा फार शिताफीने वापर केला आहे. जैविक युद्धात बॅक...

चीनच्या ड्रॅगनचे विस्तारवादी धोरण आणि संभाव्य धोके

भारताला जागतिक महासत्ता व्हायचे असेल तर...  प्रा. डॉ. योगेश मलशेट्टे पुणे रिसर्च टाईम्स  +91 - 9403981666 (व्हाट्सएप) भारताला जागतिक महासत्ता व्हायचे असेल तर आपल्यालाही तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन मध्ये जबरदस्त मक्तेदारी निर्माण करावीच लागेल. आणि त्यासाठी इंधन आणि खनिज संपत्ती यांची नितांत गरज आहे. म्हणून भारताने चीनच्या डावाला प्रतिडाव अन् शहाला प्रतिशह द्यावाच लागेल. मध्य आशिया चीनच्या घशात जाणार नाही ह्याची तजवीज करावी लागेल.  भारताने आपल्या प्राचीन संस्कृतीचा इतिहास पाहून वर्तमान विदेश नीती चा पुनर्विचार करावा असाही आपण २०१४ पासून मोदी युगात खूप बदल केलेले आहेत उदा सांगायचे असेल सर्जिकल स्ट्राईक असो वा एअरस्ट्राईक आसो.  "वसुधैव कुटुम्बकम्"  हे भगवतगीतेतील असो वा ज्ञानेश्वर माऊली नि पसायदान मध्ये म्हटले आहे की, हे विश्वची माझे घर त्यासाठी हे विश्व आगोदर माझे म्हणजे भारताच्या ताब्यात आसले पाहिजे अंतरिक्ष आसो वा समुद्रतळ आसो.  बौद्धपूर्व कालखंडात तिबेटला त्रिविष्टप हे नाव होते. हिंदूंचे तेथे राज्य होते. झिनजियांग सह सबंध मध्य आशिया व अफगाणिस्तान येथे प्राचीन ...

हिमालयीन 'ट्राय-जंक्शन्स' वर चीनचा डोळा

हिमालयीन 'ट्राय-जंक्शन्स' वर चीनचा डोळा    प्रा. डॉ. योगेश मलशेट्टे पुणे रिसर्च टाईम्स भारत-चीन या ४०५६ किमी लांब सीमेवर एकूण ४ महत्वाचे 'ट्राय-जंक्शन्स' आहेत.  'ट्राय-जंक्शन' म्हणजे काय, तर एक असा छोटासा भूभाग जिथे तीन देशांच्या सीमा येऊन मिळतात. हा भूभाग लष्करीदृष्ट्या अतिसंवेदनशील असतो.  ही 'ट्राय-जंक्शन्स' हिमालयाची प्रवेशद्वारे आहेत. जी अशा मोक्याच्या ठिकाणी आहेत की जो देश या चारही ट्राय-जंक्शन्स वर ताबा मिळवेल, तोच या खडतर हिमालयीन युद्धक्षेत्रात वरचढ ठरेल. कारण त्यांची भौगोलिक स्थिती सैन्याला जबरदस्त लेव्हरेज प्रदान करते. ही ट्राय-जंक्शन्स खालीलप्रमाणे आहेत-  १. सियाचीन ग्लेशियर  २. कालापानी / लिपुलेख पास  ३. डोकलाम  ४. दिफु पास सुदैवाने या ४ पैकी ४ ही ट्राय-जंक्शन्स भारताच्याच अधिपत्याखाली आहेत. साहजिकच चीनी ड्रॅगनची वक्रदृष्टी यांवर आहे. म्हणून या सर्व ट्राय-जंक्शन्सचे सामरिक महत्व जाणून घेणे आवश्यक ठरते.  १. सियाचीन ग्लेशियर- 🇮🇳🇵🇰🇨🇳 भारत-पाकिस्तान-चीन यांच्या सीमा या फक्त   ७६ चौ.किमी क्षेत्रफळ असलेल्या सियाचीन ट्राय...