आधुनिक अभिनव तंत्रगुरु श्री राजीवभाऊ जगताप सर :- एक अनुभव लेखक:- प्रा डॉ योगेश मलशेट्टे अभिनव एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप सर यांच्या अथक प्रयत्नांनी १९९८ मध्ये संस्थेची स्थापना केली तसेच 2007 मध्ये वडवाडी या ठिकाणी तंत्र संकुलनाची सुरुवात केली. आज सोसायटीचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. अभिनव एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक आणि डिग्री हे याचाच एक भाग आहे या इंजीनियरिंग कॉलेजच्या मार्फत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजीव भाऊ जगताप यांनी वडवाडी, भोर पासून जवळच, भाटघर धरणाच्या अगदी समोर चाळीस एकर च्या विशाल वडवाडी पठारा वरील कॅम्पसमध्ये तंत्रशिक्षणाची ची सुरुवात केली आणि आज इथे सर्व सुविधायुक्त तंत्रशिक्षणाचे संकुल अतिशय जोमात तंत्रशिक्षण देण्याचं काम करत आहे मला इथे आवर्जून सांगावेसे वाटते की या तंत्रनिकेतनात साधारणता 22 जिल्ह्यातील 122 पेक्षा जास्त तालुक्यातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा या भागातील ग्रामीण भागातील विद्यार्थी या तंत्रशिक्षणात ऍडमिशन
पानिपत लढाई ! प्रा डॉ योगेश मलशेट्टे एडिटर इन चीफ पुणे रिसर्च टाईम्स 9403981666 दीड लाख लोकांनी आहुती देऊन अनेक धडे आपल्याला असे अनेक शिकवले आहेत, त्यातुन आपण बोध घेणार आहोत का? आपण त्यातून काही शिकलो आणि स्वतःमध्ये सुधारणा केल्या तर तेच पानिपतावर धारातिर्थी पडलेल्या वीर सैनिकांना खऱ्या अर्थाने नमन ठरेल. आज चौदा जानेवारी! आज उत्तरायण येईल, संक्रात होईल, पतंग उडवले जातील, आणि एकमेकांना तिळगुळ खाऊ घालुन तोंड गोड केले जाईल. ह्या सगळ्यात दोनशे एकसष्ट वर्षांपुर्वी जे घडलं होतं, ते कोणाला आठवायची इच्छा होईल का? “...आणि पानिपत होते !” सर्वात कमी वेळात, समोरासमोरच्या युद्धात सर्वात जास्त लोक मारले गेले, आतापर्यंत झालेलं जगातलं सर्वात संहारक युद्ध आहे, पानिपत! पानिपत ही मराठी माणसाच्या मनावरची एक जखम आहे, पानिपतावर एक अख्खी मराठी पिढीच नष्ट झाली. पानिपत झालं नसतं तर इंग्रज भारतावर राज्य करु शकले असते का? का झालं होतं पानिपत? पानिपत युद्धाचे परिणाम काय झाले? ह्या युद्धातून आपण काही शिकलो का? अफघाण योद्धा अहमदशहा अब्दाली आपल्या रानटी टोळ्यांना घेऊन चौंथ्यादा दिल्ली लुटायला येतो, तेव्हा आपल्या